न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट २०२०) :- कोणाला काही सांगशील तर मुलीला व आईला औषध टाकून मारून टाकीन, नाही तर स्वतः मरतो, अशी धमकी देत जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर लैगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
चिखली येथे २०१८ ते सोमवारी, १७ ऑगस्ट २०२० रोजी व गावी असताना व तेथून परतल्यावर आरोपी हा आपल्या मुलीवर अत्याचार करीत असल्याचे मुलीच्या आईने पाहिले.
मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलीच्या आरोपी ३७ वर्षीय पित्याला अटक केली आहे. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.














