- फेरीवाला आत्मनिर्भरचे शहरातून पहिले पाच लाभार्थी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील पथविक्रेते, स्टॉल, हातगाडीवाले, फेरीवाला, पथारी अशा छोट्या व्यावसायिकांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून १० हजार रु. व्यावसायिक कर्ज देवून त्यांना स्वावलंबी बनविण्यात प्रयत्न आहे. याचे राज्यातील पहिले पाच लाभार्थी पिंपरी चिंचवडमधील ठरले आहेत. या लाभाच्या धानदेश प्रतिकृतीचे वितरण आमदार महेश लांडगे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष तथा मनपा सदस्य काशिनाथ नखाते, इरफान चौधरी, प्रकाश साळवे, अनिल बारवकर, नागनाथ लोंढे, ओमप्रकाश मोरया, सलीम हवालदार आदी उपस्थित होते.
शहरातील दहा हजारांहून अधिक पथविक्रेत्यांना लाभ मिळणार असून या योजनेचा लाभ अधिकाधिक फेरिवाल्यानी घ्यावा व या निधीतून मिळणा-या अर्थ सहाय्यातुन आपली पत निर्माण करावी. दहा हजाराच्या पुढे जाऊन एक लाख मिळतील, अशी आपली पत निर्माण करावी. फेरीवाला आदर्श व्यवसाय करु शकतो हे दाखऊन द्यावे, असे मत आ. महेश लांडगे यानी केले.
शहरातील पथविक्रेते, हातगाडीवाले, पथारी हे नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. अनेक वेळा त्याना त्रासाला सामोरे जावे लागात असते. त्यांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता करण्यात भूमिका बजावित असतात. त्यात पथविक्रेते, फेरीवाले, पथारी, हातगाडीवाले, चहा नास्ता, कपडे, भाजीपाला, फळे, खाद्य पदार्थ आदी विविध वस्तूची विक्री करीत असतात.
कोरोना विषाणू साथीच्या महामारीत फेरीवाला, पथविक्रेता हे आर्थिक संकटात सापडले आहेत. लाॅकडाऊनच्या टाळेबंदीत अनेकांवर उपासमारीची वेळ आलीय. काहींचा उदरनिर्वाह त्या व्यवसायांवर होता. अनेकांचे भांडवल लाॅकडाऊनमध्ये शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने द्यावी अशी मागणी नैशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाकडून करण्यात आली होती. ती केंद्राने मान्य केली व थोडी तरी मदत जाहिर केली आता पुढे जाण्याची आवश्यकता आहे.
केंद्र शासनाच्या सुचनेनूसार पिंपरी चिंचवड महापालिका पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे. त्यातून प्रत्येक पथविक्रेत्यांना दहा हजार रुपयाचे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शहरातील दहा हजारांहून अधिक पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले आदींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सचोटीने व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या फेरीवाल्यांनी यात लाभ घेणे गरजेचे आहे. पथ विक्रेता स्वनिधी अमंलबजावणीस महापालिकेकडून सहकार्य होत आसुन आयुक्त श्रवण हार्डीकर, अति. आयुक्त अजित पवार, सहा आयुक्त उल्हास जगताप यांचे सहकार्य मिळत असुन या योजनेचा पुणे जिल्ह्यातील सर्व पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काशिनाथ नखाते यांनी केले.














