न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) रोजी ११३१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात निगडी (पुरुष ५२ वर्ष ) आकुर्डी ( ५४ व ५५ वर्षीय पुरुष ) चिंचवड ( ३३ व ६२ वर्षीय पुरुष ) मोशी (पुरुष ६२ वर्ष) वल्लभनगर (पुरुष ६६ वर्ष) जुनी सांगवी ( ५४ व ७३ वर्षीय स्त्री ) चिखली ( ६३ , ४५ व ६६ वर्षीय पुरुष ) थेरगांव (स्त्री ६० वर्ष) मासुळकर कॉलनी (पुरुष ७८ वर्ष) कासारवाडी ( ५४ व ५५ वर्षीय पुरुष) अजमेरा (स्त्री ७३ वर्ष) कल्याण (स्त्री ६१ वर्ष) खेड (पुरुष ५४ वर्ष) जुन्नर (स्त्री ६० वर्ष) सोमाटणे (स्त्री ७२ वर्ष) या रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३८८२१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ७३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २५७७० वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















