न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. ऑगस्ट. २०२०) :- कोरोना काळात सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आणि पोलिस प्रशासनाने केले आहे. त्यास गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, सार्वजनिक मंडळांची मागणी घटली असली तरी घरगुती ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी विद्युत माळांसह सजावटीचे विविध साहित्य विक्रीस ठेवले आहे.
बाजारात लेदर फोकस, पॉवर लाइट, थ्री स्टार चांदणी, हॅलोजनसह विविध रंगांचे बल्ब विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. काही प्रमाणात भारतीय बनावटीच्या लाईट माळा दाखल झाल्या आहेत.
दुसरीकडे, शहरातील मिठाई विक्रेते, स्वीटमार्ट या दुकानांत वेगवेगळ्या रंगांचे व आकाराचे मोदक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच सराफी पेढ्यादेखील उत्सवासाठी सज्ज झाल्या आहेत. मात्र बाजारपेठेत खरेदीसाठी शहरातील नागरिकांचा निरुत्साह पहावयास मिळत आहे.















