न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. ऑगस्ट. २०२०) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.
शिवसेना नेते, खासदार, पुणे विभागीय संपर्कनेते संजय राऊत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख माउली कटके यांनी कळविली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघतून विधानसभा संघटकपदी तुषार सहाणे, रावसाहेब थोरात, जिल्हा समन्वयकपदी राहुल भोसले, विधानसभा समन्वयकपदी दादासाहेब नरळे, दत्तात्रय भालेराव, अंकुश जगदाळे, अभिमन्यू लांडगे, उपशहरप्रमुखपदी अनिल सोमवंशी, राहुल गवळी, विभागप्रमुखपदी नितीन बोंडे (रुपीनगर तळवडे), सतीश मरळ (ओटास्कीम) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.















