- महापौरांकडून आयुक्तांना त्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील दोन महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यस्थानी होत्या. यावेळी अधिकारी कामाला टाळाटाळ करत आहेत. कामांसाठी कनिष्ठ अभियंत्याला फोन केला असता अधिका-यांने फोन रेकॉर्ड केला. तो फोन दुस-या नगरसेवकाला ऐकवल्याचे नगरसेविकेने सभेत सांगितले. तसेच या अधिका-यावर कारवाईची मागणी केली.
याप्रकरणी सभागृह नेते नामदेव ढाके यांनी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्याची मागणी महापौरांकडे केली. त्यावर नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते.
नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा, असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.















