- शैक्षणिक अर्हता नसतानाही नेमणूक कशी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांची शैक्षणिक अर्हताच नाही. तरीही त्यांना पदावर बसवल्याचा धक्कादायक आरोप महासभेमध्ये नगरसेवकांनी केला.
महासभेत नगरसेवक योगेश बहल म्हणाले, वायसीएम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. वाबळे आहेत. त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकारच नाही. कारण त्यांची त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता नाही. त्यांना रुग्ण हाताळण्याचा कोणताही अनुभव नाही.
तसेच पदव्युत्तर संस्थेचा डीन असेल तर त्यांना शिकवणुकीचा अनुभव आवश्यक आहे. मात्र डॉ. वाबळे यांना तोही अनुभव नाही. तसेच त्यांना नियुक्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही यावेळी नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले व डॉ. वाबळे यांच्या अर्हतेबाबत शंका उपस्थित केली.















