न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- पिंपळे गुरवमध्ये पंधरा ते वीस दशलक्ष लिटर पाणीक्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. मुख्य बस थांब्याजवळील पाण्याची टाकी खूपच कमी क्षमतेची होती. त्यातच जीर्ण झालेली ही पाण्याची टाकी गेल्या काही वर्षांपासून बंद होती. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या कामात या टाकीचा अडथळाही होत आहे.
त्यामुळे पाणीपुरवठा विभाग यांचा सल्ला व त्याचा रितसर ठराव घेऊन ही टाकी पाडली जात असल्याचे कार्यकारी अभियंता मनोज सैठिया यांनी सांगितले. या टाकीच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावरची रहदारी लक्षात घेता, सर्व बाजूंनी खबरदारी घेऊन पिंपळे गुरव येथील जुनी पाण्याची टाकी पाडण्याबाबत महापालिकेच्या वतीने कार्यवाही झाली.















