न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला कोषाध्यक्षपदी शैलजा मोळक, युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अनुप मोरे, तर महाराष्ट्र प्रदेश युवती विभागाच्या सहसंयोजकपदी वैशाली खाड्ये यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या निवडीमुळे भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे.















