न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) रोजी १०३९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात नेहरुनगर (स्त्री ६८ वर्षे), संत तुकारामनगर, पिंपरी ( पुरुष ८९ वर्षे, स्त्री ७५ वर्षे), मोरेवस्ती, चिखली (पुरुष ७२ वर्षे), पुनावळे (पुरुष ४० वर्ष), चिंचवड (पुरुष ७३ वर्षे), रहाटणी (पुरुष ६० वर्षे), दापोडी (पुरुष ५० वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष ६० वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ६५ वर्षे), पिंपरी (स्त्री ३४ वर्षे), चाकण ( पुरुष ६० वर्षे), कोंढवा (पुरुष ४७ वर्षे), तसेच पुणे म.न.पा. हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण पिंपळे गुरव (पुरुष ७० वर्षे, स्त्री ८० वर्षे, पुरुष ६७ वर्षे), चिंचवड (पुरुष ८४ वर्षे, स्त्री ७० वर्षे), काळेवाडी फाटा (पुरुष ६३ वर्षे), निगडी (पुरुष ७० वर्षे), दिघी (पुरुष ५२ वर्षे), पिंपळे निलख (स्त्री ६३ वर्षे) या रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४०८९८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्य शासनाचे कोव्हीड १९ पोर्टलनुसार ०९ पिं. चि. मनपा रहिवाश्यांचे पूर्वी झालेले मृत्यू हे पिं.चिं. मनपा हद्दीबाहेरील रुग्णालयात झाल्याची नोंद घेतल्याने प्रगतीपर अहवाल ७७१ आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७१६६ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















