न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. ऑगस्ट. २०२०) :- मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होऊन हजारो लीटर पाणी वाया गेले. मात्र लागलीच दुरुस्ती करण्यात येऊन गळती थांबविण्यात आली. मोशी येथे स्पाईन रस्त्यावर स्पाईन सिटीजवळ मंगळवारी दुपारी ही गळती झाली.
महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मलनिस्सारण वाहिनी बदलणे, दुरुस्ती करणे, नवीन वाहिनी टाकणे आदी कामे केली जात आहेत. त्याच अनुषंगाने ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्पाईन रस्यावर स्पाइन सिटी परिसरात मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू आहे. या वाहिनीचे काम करताना मंगळवारी दुपारी येथील जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागला. यात जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी वाया गेले.















