- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पोहोचली २९७३३ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) रोजी ८५७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात चिंचवड (पुरुष ५९ वर्षे, पुरुष ६९ वर्षे, पुरुष ६९ वर्षे), रहाटणी (पुरुष ४३ वर्षे, स्त्री ९४ वर्षे), सांगवी (पुरुष ७५ वर्षे, स्त्री ६५ वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष ७५ वर्षे), चिखली (पुरुष ६२ वर्षे, पुरुष ४८ वर्षे), किवळे (पुरुष ६४ वर्षे), निगडी (स्त्री ५० वर्षे, पुरुष ७७ वर्षे), मोशी (पुरुष ६५ वर्षे), काळेवाडी (स्त्री ६० वर्षे, स्त्री ६० वर्षे, पुरुष ७५ वर्षे), भोसरी (पुरुष ४८ वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ५५ वर्षे), च-होली (स्त्री ८० वर्षे) देहुगाव (पुरुष ४९ वर्षे), देहुरोड (स्त्री ६५ वर्षे), मंचर (स्त्री ५५ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४३३७४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ८२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २९७३३ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















