न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- गोरगरीब निर्धन कष्टकरी जनतेला मोफत उपचार मिळावेत, या मागणीसाठी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, उपायुक्त नवनाथ जगताप यांची भेट घेतली आणि चर्चा केली. धर्मादाय अंतर्गत पुणे विभागात येणारे एकुण ५४ हॉस्पिटलच्या मुख्याधिकारी यांची देखील भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी लोकशाही संस्था अध्यक्ष अजय लोंढे, भीमा कोरेगाव संघर्ष समिती अध्यक्ष अनिता साबळे आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले, शहरातील रिक्षाचालक, टपरी-पथारी हातगाडीधारक, कागद, काच, पत्रा वेचक, धुणी भाडी, स्वयंपाक, साफसफाई कामगार या गोरगरिब निर्धन कष्टकरी जनतेला शहरातील आदित्य बिर्ला, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, धनश्री, स्टर्लिंग हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत. कोरोना कॉविड १९ परिस्थितीत बेड उपलब्ध नाही. अगोदर पैसे भरा अन्यथा उपचार केले जाणार नाही, असे विविध कारणे सांगुन गोरगरीब कष्टकरी जनतेला आरोग्य उपचार दिले जात नाही. यामुळे गोरगरीब कष्टकरी जनतेची हेळसांड होत असुन, अनेक व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे.
आत्तापर्यंत धर्मादाय अंतर्गत निर्धन आर्थिक दुलबल घटकासाठी दोन हजार कोटी रुपयांचे मोफत उपचार झाले आहेत. गोरगरिबांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी पुढाकार घेऊ, असे धर्मदाय आयुक्त दिलिप देशमुख म्हणाले.















