न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे रजेवर आहेत. त्यामुळे भांडार विभागाची अतिरिक्त जबाबदारी सहायक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात आप्तकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी थेट पद्धतीने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. नियमबाह्यपणे खरेदी केली जात असल्याचा आरोप भांडार विभागावर केला जात असल्याने हा विभाग सध्या चर्चेत आहे.
त्यात सहायक आयुक्त चितळे हे रजेवर गेले आहेत. त्यामुळे कर संकलन विभागाच्या सहायक आयुक्त झगडे यांच्याकडे या विभागाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी या विभागाचे कामकाज सोमवार (दि. २५) पासून सुरू केले.















