- आज १०३१ जणांना कोरोनाची बाधा तर, १८ जणांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २६ ऑगस्ट) रोजी १०३१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात पिंपळे सौदागर (पुरुष ७३ वर्षे, ताथवडे (स्त्री ६० वर्षे), मोशी (स्त्री ६५ वर्षे), निगडी (स्त्री ०१ वर्षे), वाकड ( स्त्री ७५ वर्षे), आकुर्डी (पुरुष ७० वर्षे), रावेत (पुरुष ८९ वर्षे), काळेवाडी (पुरुष ४० वर्षे, पुरुष ५८ वर्षे), चिखली (पुरुष ६४ वर्षे), भोसरी (पुरुष ८० वर्षे), दिघी (स्त्री ७५ वर्षे), चिंचवड (पुरुष ६५ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६३ वर्षे), पिंपरी (पुरुष ७५ वर्षे), तळेगाव दाभाडे (स्त्री ४९ वर्षे), राजगुरुनगर (स्त्री ५७ वर्षे), धनकवडी (स्त्री ६७ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४४४०५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ८४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३११३६ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















