न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी तीन दुचाकी चोरीला गेल्याने अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार शोरुम समोरुन बुलेट गाडी चोरीला गेल्याची घटना सोमवारी रात्री सवा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी शशिकांत अरुण चोपडे (वय ३१, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसरी घटना भोसरी येथे घडली असून त्याप्रकरणी संतोष श्यामबिहारी शर्मा (वय ४२, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची एका कंपनीची दुचाकी लॉक करुन भोसरीतील पूलाखाली पार्किंग केली होती. अज्ञात चोरट्याने लॉक तोडून ती मोटारसायकल पळवल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
२३ ते २४ ऑगस्ट दरम्यान सकाळी अकराच्या सुमारास तळेगाव दाभाडे या ठिकाणाहून फिर्यादी जितेंद्र चिलाजी मराठे (वय ३४, रा. वराळे, मावळ) यांची दुचाकी चोरीला गेली आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेले असताना तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलसमोर लॉक करुन पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली.















