न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- पवना सहकारी बँकेच्या संचालिका आणि माजी नगरसेविका शकुंतला साठे यांचे आज दि. २७) अल्प आजाराने निधन झाले.
शकुंतला साठे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका होत्या. पिंपरी भागातून त्या निवडून आल्या होत्या. त्या पवना सहकारी बँकेच्या संचालिका देखील होत्या. भाजी विक्रेता ते नगरसेविका असा त्यांचा प्रवास होता. मागील काही दिवसांपूर्वी त्या आजारी पडल्या. त्यातच त्यांचे निधन झाले.


















