न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावरील साई चौक (जगताप डेअरी) चौकातील नव्याने बांधण्यात आलेल्या समतल विलगक (ग्रेट सेपरेटर) एकेरी मार्गाचे उदघाटन आज गुरुवारी (दि. २७) रोजी पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी विरोधी पक्षनेते विठठ्ल ऊर्फ नाना काटे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागरहून हिंजवडी आय टी पार्ककडे जाणाऱ्या आयटीयन्सची वाहतूक कोंडी तून सुटका होईल.
यावेळी स्थानिक नगरसेविका शितल नाना काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, स्थायी सभापती ममता गायकवाड, नगरसेविका आरती चोंधे, संदीप कस्पटे, तसेच सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, उपअभियंता संजय काशीद, विद्युत विभागाचे उपअभियंता महेश कावळे, कनिष्ठ अभियंता अभिजित दाढे व अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


















