न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :- पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने सुरु आहे. मेट्रोचे काम अधिक तत्परतेने करण्यासाठी फुगेवाडी मेट्रो स्थानक ते सँडविक कंपनी येथील ग्रेड सेपरेटर रस्ता २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२० या कालावधीत सकाळी अकरा ते सायंकाळी सहा आणि रात्री अकरा ते सकाळी सहा या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या काळात बीआरटीएस मार्ग देखील बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सेवा रस्त्याचा वापर करावा. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी. तसेच पुणे मेट्रोच्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे.














