- रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्क्यांवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. सप्टेंबर. २०२०) :- देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंगळवारी राज्यात १५ हजार ७६५ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ८ हजार ३०६ वर पोहोचली आहे.
तसंच राज्यात सध्या दोन लाखांच्या जवळपास अॅक्टिव्ह केसेस असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिवसभरात १० हजार ९७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मंगळवारी राज्यात १५ हजार ७५६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ३२० मृत्यूंचीही नोंद करण्यात आली. राज्यात सध्या १ लाख ९८ हजार ५२३ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ५ लाख ८४ हजार ५३७ रूग्णांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्के इतका झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत ४२ लाक ११ हजार ७५२ करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८ लाख ८ हजार ३०६ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.














