- दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून प्रभाग परिसर दणाणून गेला – पांडाभाऊ साने…
- प्रभाग १ मध्ये सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण व मूर्तीदान संकल्पनेस उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर. २०२०) :- कोरोनामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. प्रभाग १ मधील चिखली परिसरात आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे खंदे समर्थक पांडाभाऊ साने युवा मंचचे अध्यक्ष पांडाभाऊ साने यांच्या वतीने ‘ऑनलाईन घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निवडक देखाव्यांना आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चिखली घाटावर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी होती. घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे किंवा मूर्ती दान करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. चिखलीकरांच्या सोयीसाठी पांडाभाऊ साने यांनी प्रभागात विसर्जन रथाची सोय केली होती. त्यालाही चिखलीकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल सात हजार गणेशमूर्तींचे याद्वारे विसर्जन करण्यात आले. अशा रीतीने दोन्ही उपक्रमाच्या माध्यमातून प्रभाग परिसर दणाणून गेला होता.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला एल.ई.डी टीव्ही, इतर स्पर्धकांना स्मार्ट फोन, वॉटर प्युरीफायर, गॅस शेगडी, होम थिएटर मिक्सर, कुकर, डिनरसेट, ज्यूसरसह आदी बक्षिसांचे वाटप करण्यात आले. प्रभागातील अतिष मारुती थोरवडे, साक्षी रमेश फाटक, अश्विनी दत्तात्रय सावंत, दीपा विशाल फडतरे, मनोज जाधव, मयूर शिंदे, श्वेता शिंदे, सुरज पाचपांडे, विनय मुदियार, प्रियांका फुटक या स्पर्धकांनी बक्षिसे पटकाविली.

आमदार महेशदादा लांडगे म्हणाले की, कोरोना काळात सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांनी प्रभागातील नागरिकांना कधीही अंतर दिले नाही. मोठी जोखीम पत्करून नागरिकांना मदतीचा हात दिला. जिल्ह्याबाहेरील देखील अनेकांना जमेल तशी मदत केली. गणेशोत्सवातील त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. प्रभागातील नागरिकांसाठी ऑनलाईन घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेसारखा उपक्रम राबवून त्यांच्या कलागुणांना वाव दिला. प्रभागात विसर्जन रथाची सोय करून नागरिकांची विसर्जनाची गैरसोय टाळली, अशा उपक्रमांनीच प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची क्रेज वाढत आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी राहील.
युवा नेते पांडाभाऊ साने म्हणाले की, यंदा सर्वांच्याच उत्सवावर कोरोनाचे सावट होते. सण साध्या पद्धतीने मात्र, भक्तीभावाने साजरा व्हावा, यासाठी गणेशोत्सवा दरम्यान आमदार महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत, प्रभाग १ मध्ये ‘ऑनलाईन घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात नागरिकांनी हिरारीने सहभाग घेतला. सजावट स्पर्धेत स्पर्धकांनी कोरोना योद्धा, रुग्णालय, पर्यावरण व इतर विषयांवरील देखावे तयार करून सामाजिक संदेश दिला. सामाजिक सुरक्षा राखत स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन देखावा व सजावटीची पाहणी केली. यातील काही निवडक सजावटी व देखाव्यांना एल.ई.डी टीव्ही, स्मार्ट फोन, वॉटर प्युरीफायर, गॅस शेगडी, होम थिएटर मिक्सर, कुकर, डिनरसेट, ज्यूसरसह आदी बक्षिसांचे वाटप करण्यात आले. या दरम्यान भक्तीमय व उत्सवाचे वातावरण तयार झाले होते.
दरवर्षी महापालिकेच्या वतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी चिखली घाटावर सोय केली जाते. मात्र, यंदा कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी घाटावर कोणतीही व्यवस्था केली नाही. मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जन रथाची संकल्पना राबविली. प्रभागात घरोघरी विसर्जनासाठी ११ वाहनांची सोय केली होती. हा उपक्रम गेली पाच दिवस चालला. यात जवळपास ७००० गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात आले. त्यामुळे नियमांचेही पालन झाले. प्रभागातील अनेक मंडळांनी या उपक्रमाबद्दल आभार मानले. लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला. यासाठी माझ्या कार्यकर्त्यांचेही मोठे योगदान आहे.


















