न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये करोना या विषाणुबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी महानगरपालिकेत उभारण्यात आलेल्या कोविड-१९ वॉररूमला आज गुरुवारी सायं ६ वाजता भेट दिली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते ढाके, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, योगेश बहल, नगरसेवक मयूर कलाटे आदी उपस्थित आहेत.
आयुक्त श्रावण हर्डीकर वॉररूम मार्फत सुरु असलेल्या कामकाजाची माहिती देत आहेत. तसेच महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने केलेल्या विविध उपाययोजना आणि व्यवस्थापनाची माहिती देखील देत आहेत.


















