न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२०) :- भोसरी येथील इंद्रायणीनगर भागात महवितरणच्या डि.पी. मध्ये स्फोट होऊन कोतवाल कुटुंबातील सदस्यांचा हकनाक बळी गेला. ज्यामध्ये दोन महिला व लहान बाळाचा समावेश आहे. महावितरणच्या नागरीवस्तीत झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाच्या मुख्य अभियंता गवारे यांना शिवसेनेचे पुणे उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके यांनी निवेदन देऊन कोतवाल परिवाराला नुकसान भरपाई देण्याची व संपूर्ण भोसरी विधानसभा क्षेत्रातील असुरक्षित ठिकाणे सुरक्षित करण्याची मागणी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची दखल वेळेत न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
यावेळी त्यांचेबरोबर युवा सेना जिल्हा युवा अधिकारी सुरज लांडगे, विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे, रामदास गाढवे, उपविभाग प्रमुख संदीप टोके, संतोष वरे, दीपक सोनवणे, संभाजी शिंदे, संदेश मुळे, व्यंकटेश अजेगावकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.