न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- पीएमपीएमएलमध्ये यापुढे ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश मिळणार आहे. मुंबईत बेस्टने घेतलेल्या धर्तीवर पीएमपीएमएलने ही ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने मागील ५ ते ६ महिन्यापासून पीएमपीएमएल बंद होती. मात्र, दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या बसेसमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, पीएमपीएमएल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.