- पाचशेच्यावर रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ०८ सप्टेंबर) रोजी १०१४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५१५ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात पिंपरी (स्त्री ८२ वर्षे), मोशी (स्त्री ५६ वर्षे, पुरुष ६१ वर्षे), अजमेरा (स्त्री ६१ वर्षे), काळेवाडी (पुरुष ८४ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ६५ वर्षे, स्त्री ७३ वर्षे), अजंठानगर (स्त्री ५०), तळवडे (पुरुष ५७ वर्षे), चिखली (पुरुष २९ वर्षे), रहाटणी (स्त्री ४४ वर्षे), भोसरी (पुरुष ६६ वर्षे), निगडी (स्त्री ७२ वर्षे), बिजलीनगर (स्त्री ८३ वर्षे), दिघी (स्त्री ८० वर्षे), पिंपळेसौदागर (पुरुष ४८ वर्षे), आळंदी (पुरुष ५० वर्षे), आंबेगांव (पुरुष ६० वर्षे), मंचर (पुरुष ५१ वर्षे), सातारा (पुरुष ४७ वर्षे), बारामती (पुरुष ६७ वर्षे), दौंड (पुरुष ६५ वर्षे), खेड (स्त्री ७५ वर्षे), खंडाळा (पुरुष ७६ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५७५०७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४७५९२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ९५९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














