न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. दोन्ही कैद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.
अनिल विठ्ठल वेताळ (वय २१, रा- गणेश नगर, भीमा कोरेगाव, ता-शिरूर, जि- पुणे) आणि विशाल रामधन खरात (घर नं ५, फातिमा मशिदीसमोर श्री समर्थ हौसिंग सोसायटी, निगडी) असे पळून गेलेल्या कैद्यांचे नाव आहे.
वेताळ आणि खरात हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक १०४ मधील पहिल्या मजल्यावरील रुम नंबर १ मध्ये ठेवण्यात आले होते.