न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर. २०२०):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या सांगवीतील टेरेसवरील भंगार साहित्याने अचानक पेट घेतला. आज शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पालिकेच्या सुरक्षा रक्षकाने रहाटणीतील अग्निशामक उपकेंद्रास पाचारण केले. अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीचे कारण मात्र, समजू शकले नाही.