- हा निर्णय लोकप्रतिनिधींसह पालिकेच्या महापौरांनी घ्यावा – अजित पवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२०) :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुण्यात शहरासह ग्रामीण भागात जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घ्यावा, त्याला माझी सहमती असेल. परंतु उद्योग धंद्यावर परिणाम झालेला मला चालणार नाही, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी पुण्यात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
यामुळे तूर्त तरी पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन गुरुवारी मुंबई शहरात १४४ कलमानुसार संचारबंदी लागू केली. त्यानंतर मुंबई सारखीच संचारबंदी पुण्यात देखील लागू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.














