न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत पाणीपुरवठा विषयी बैठक संबंधीत अधिका-यांसोबत आयोजीत करण्यात आलेली होती.
बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,म.न.से.गटनेते सचिन चिखले,अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,नगरसदस्य अभिषेक बारणे,तुषार कामठे, अतिरीक्त आयुक्त अजित पवार, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पाणीपुरवठा विषयक प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी उपमहापौर तुषार हिंगे व तसेच अन्य पदाधिकारी यांनी विचारण्यात आले आलेल्या प्रश्नांबाबत माहिती घेऊन ती पुढील बैठकीत सादर करण्यात येईल असे नमूद केले.











