न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२०) :- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची बाधा झाली आहे. वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. “आज माझ्या तपासणी दरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
दरम्यान मागील पाच दिवसात महाविकास आघाडीच्या चार मंत्र्यांना करोनाची बाधा झाली आहे. अशात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही करोनाची बाधा झाली आहे. वर्षा गायकवाड यांची प्रकृती चांगली आहे याबाबत त्यांनीच ट्विट करुन माहिती दिली आहे.