न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दापोडी येथील मुळा नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्यात आली असुन आज तो वाहतुकीच्या दृष्टीने नगारीकांसाठी खुला करण्यात आल्यामुळे दापोडी येथील वाहतुक कोंडी कमी होऊन वाहतुक सुरळीत होणार असल्याचे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
दापोडी येथील हॅरीस पुल दुरुस्तीचे काम नुकतेच पुर्ण झालेले असल्याने सदर पुलाची दुसरी बाजु वाहतुकीच्या दृष्टीने नागरीकांसाठी खुला करणे आवश्यक होती. त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पार पाडले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, स्वाती उर्फ माई काटे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, क्षेत्रीय अधिकारी संदिप खोत, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.