- चिंचवडेनगरमधील रहदारीच्या रस्त्यावरील त्या धोकादायक चेंबरची डागडुजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- चिंचवडेनगर येथे चेंबरचे झाकण अर्धवट व धोकादायक अवस्थेत उघडे पडले होते. त्या चेंबरची पालिका प्रशासनाकडून नुकतीच डागडुजी करण्यात आली आहे. याबाबत न्यूज पीसीएमसीने ‘चिंचवडेनगरमध्ये रहदारीच्या रस्त्यावरील चेंबरचे झाकण धोकादायक अवस्थेत; अपघाताची शक्यता’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती.
साई मंदिरापासून दगडोबा चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकरखाली असणारे चेंबरचे झाकण अर्धवट अवस्थेत उघडे पडले होते. या रस्त्यावर मोठी रहदारी असते. मोठा पाउस पडल्यावरदेखील या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे मोठे डबके साचते. त्यामुळे अर्धवट उघड्या चेंबरमुळे रात्री-अपरात्री अपघात होण्याची शक्यता होती. चेंबरची डागडुजी केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


















