न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे दोन्हीही भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
निलेश राणे म्हणाले कि, पवार साहेबांनी असे वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं. पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.















