- राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सेवाही होणार सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- राज्य सरकारनं रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्यानं राज्य सरकारनं काही निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, ऑक्टोबरपासून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी होत होती. त्यासंदर्भात राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं बंधन सरकारन घातलं आहे.
राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.















