- आज ७६४ जणांना कोरोनाची बाधा तर, १७ जणांचा मृत्यु; ८२७ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) रोजी ७६४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे भोसरी (पुरुष ६४ वर्षे,पुरुष ३८ वर्षे), चिंचवड (पुरुष ५६ वर्षे, स्त्री ६० वर्षे), च-होली (पुरुष ५४ वर्षे, पुरुष ७७ वर्षे), दिघी (पुरुष ५० वर्षे), काळेवाडी (स्त्री ५० वर्षे), चिखली (पुरुष ५१ वर्षे), पिंपरी (पुरुष ५० वर्षे), कासारवाडी (पुरुष ६४ वर्षे), कृष्णानगर (पुरुष) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे हडपसर (पुरुष ६८ वर्षे), चाकण (पुरुष ६३ वर्षे), मुळशी (पुरुष ६० वर्षे), सातारा (पुरुष ५५ वर्षे), हिंजवडी (पुरुष ३९ वर्षे) येथील रहिवासी आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे १४८७३०७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ११२० व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता २३५ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७८०८१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६९८८८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १३१८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















