न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रोज वाहनचोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. बुधवारी देखील आयुक्तालयाच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले.
जगदीश प्रफुल्ल वेलिंग (वय ४०, रा. प्रभात रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी शनि मंदिर, वाकड सर्विस रोडवरून त्यांची ३० हजारांची मोपेड दुचाकी चोरून नेली आहे.
रामकृष्ण देवराम पाटील (वय ४२, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी त्यांची १५ हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे.
सीताराम पांडुरंग भागवत (वय ५५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भागवत यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १४ बीबी ४४८५) त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे.















