न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पिंपरी-चिंचवड समितीच्या संपर्कप्रमुखपदी जगन्नाथ काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
त्यांना जिल्हाध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर आणि विभागीय अध्यक्ष आनंद महाराज तांबे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी काटे यांना निवडीचे पत्र दिले आहे.















