न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- काळेवाडी-रहाटणीतील जेष्ठ नागरिक चतुर्भुज सर्जेराव जराड (वय ७० वर्षे) यांचे सोमवारी (दि. ५) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ते चिंचवडमधील ट्रिनीटी इंजिनिअर्स कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते घरीच होते. संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मात्र, त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर चिंचवड, लिंक रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘न्यूज पीसीएमसी’ चे पत्रकार संतोष जराड यांचे ते वडील होत. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.