न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- महापालिकेच्या बरखास्त विषय समित्यांचे पुनर्गठन उद्या मंगळवारी दि. ६ रोजी महासभेत होणार आहे. महापालिकेतील विषय समित्यांची मूदत १४ जून रोजी संपली. त्यानंतर विषय समित्या बरखास्त झाल्या होत्या.
विषय समितीवर नऊ सदस्यांची निवड केली जाईल. सभागृहातील संख्याबळानुसार नऊ सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य असेल. त्या-त्या पक्षाच्या सदस्यांची नावे संबंधित पक्षाचे गटनेते सर्वसाधारण सभेत महापौरांकडे सुपूर्द करतील.
त्यानंतर सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पालिका विषय समित्यांचे पुन्हा गठण करणार आहे.