न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक १२ मध्ये दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच हजार घरांची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने भूस्तर तपासणी, क्षेत्र सर्वेक्षण आणि बांधकामासाठी आवश्यक नियोजन सुरू केले आहे. प्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ( ईडब्ल्यूएस ) आणि अल्प उत्पन्न गटासाठी ( एलआयजी ) घरे बनविण्यात येणार आहेत.
प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक १२ येथे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे पाच हजार घरे उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. भूस्तर तपासणी, क्षेत्र सर्वेक्षण आणि दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी आवश्यक नियोजन प्रक्रियेला सुरवात झाली आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, निविदा प्रक्रिया राबविली जाईल. ही सर्व कार्यवाही होऊन प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होण्यास वर्षभराचा कालावधी लागेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांनी दिली.
ईडब्ल्यूएस’मधील बीएचके सदनिकांचे कार्पेट क्षेत्र ३१७.५३ चौरस फूट इतके आहे. ‘ एलआयजी ‘ मधील २ बीएचके सदनिकांचे क्षेत्र ६३७.८६ चौरस फूट इतके आहे. ११ मजल्यांच्या ४५ इमारती या प्रकल्पात होत आहेत.


















