- बुधवारी ५७० जणांना कोरोनाची बाधा तर, १३ जणांचा मृत्यु; ६६४ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ०७ ऑक्टोबर) रोजी ५७० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज महापालिका हद्दीतील ०६ पुरुष व ०२ स्त्री अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात चिंचवड (वय ८२ वर्षे, वय ७० वर्षे), चिखली (वय ७५ वर्षे), भोसरी (वय ५२ वर्षे), थेरगाव (वय ३९ वर्षे), दिघी (वय ४८ वर्षे,) चिंचवड (वय ७४ वर्षे, वय ३५ वर्षे) समावेश आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले ४ पुरुष व १ स्त्री अशा ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यात उरळी देवाची (वय ७२ वर्षे), जुन्नर (वय ७३ वर्षे), मुंबई (वय ५४ वर्षे), चाकण (वय ४८ वर्षे), खेड (वय ५८) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८१९४२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७६०५० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १३९६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















