न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- शहरात दाखल झालेल्या वाहन चोरीच्या सहा घटनांमध्ये एक जेसीबी चोरट्याने नेला. तर, उर्वरित वाहनांमध्ये बुलेट, मोपेड आणि इतर दुचाकी वाहनांचा समावेश आहे. मित्राच्या घरा समोर लावलेला ८ लाख रुपये किमतीचा जेसीबी चोरीस गेल्याची तक्रार अक्षय बाळू गाडे (वय २६, रा. शेलू खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.
खेड तालुक्यातील सवरदारी तेथे मित्र सुनील शेट्टी यांच्या घरासमोर ५ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता जेसीबी लावला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास जेसीबी जागेवर नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गोकुळ हॉटेल जवळ लावलेली बुलेट गाडी तीन ऑक्टोबरच्या रात्री चोरीस गेल्याची तक्रार रविदास रोहिदास बोराटे (वय २९ , रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस त ठाण्यात दिली आहे. तर पाच ऑक्टोबर रोजी लावलेले वाहन चोरीस गेल्याची फिर्याद संजय खंडू मळेकर (वय ४९) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरून योगेश उत्तम तुपे (वय २४) यांची स्कुटर चोरीस गेली. माया राजू गायकवाड (वय, ४०) यांची मोपेड पिंपरीतील मोकळ्या जागेतून चोरीस गेली. तर, राहुल रमेश जोगदंड ( वय २७ ) यांची दुचाकी गणेश नगर बोपखेल येथून चोरीस गेल्याची तक्रार दिघी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.















