न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२०) :- हिंजवडीतील कॅनरा बँकेच्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून चार लाख ३८ हजार रुपये काढून घेत बँकेची फसवणूक केल्याबाबत हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बँकेचे मुख्य व्यवस्थापक अतुल राजन श्याम पांडे (३६, रा. हिंजवडी) यांनी गुरुवारी (दि. ८) याबाबत फिर्याद दिली आहे. हिंजवडी येथे कॅनरा बँकेचे एटीएम सेंटर आहे.
दोन अनोळखी इसमांनी एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट कार्डचा वापर करून कॅनरा बँकेच्या मशीनमधून पैसे काढण्याची प्रक्रिया केली. हा व्यवहार नोंद होऊ नये यासाठी मशीनच्या नेटचे केबल बंद-चालू व रिसेट करून मशीनसोबत छेडछाड करण्यात आली. तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.















