न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन पिंपरी कार्यालयांतर्गत शिकाऊ व पक्क्या वाहन परवाना कोट्यात वाढ करण्यात आली आहे. त्यात दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांचा कोटा वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, येत्या शनिवार आणि रविवारी विशेष चाचणीचे नियोजन करण्यात आले आहे. चाचणी दरम्यान, चेहऱ्यावर मास्क आणि हातमोजे अनिर्वाय करण्यात आले आहे. टाळेबंदीच्या काळात वाहन शिकाऊ वाहनांचा कोटा ४०० तर, पक्क्या वाहनांचा कोटा २२५ आहे.
व्यावसायिक वाहनांचा कोटा ३२ वरून ५६ आणि दुचाकी वाहनांचा कोटा ९० वरून ११४ करण्यात आला आहे. तर, या पूर्वीचा विनागिअर दुचाकी, मोटारीचा कोटा कमी करण्यात आला आहे.















