न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांचे वडील माजी सैनिक नाईक सुभेदार किसन दगडू वडघुले (वय ८४ वर्षे) यांचे वृध्दापकाळाने मुळगाव टाकळी भिमा, ता. शिरुर, जि. पुणे येथे शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) निधन झाले.
त्यांच्या मागे एक भाऊ, दोन मुले, दोन विवाहीत मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना शिरुर माजी तालुका प्रमुख तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांचे ते वडील होत.
सैन्य दलाच्या बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपमध्ये १९६० साली ते सेवेत रुजू झाले. सेवेत असताना १९६०, १९६५ आणि १९७२ च्या युध्दांमध्ये त्यांनी सांभाळलेल्या जबाबदारीमुळे बढती झाली. २४ वर्षानंतर सैन्यातून ‘नाईक सुभेदार’ पदावरुन त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर शिरुर तालुक्यातील विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.


















