न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरूवार दि. १५/१०/२०२० रोजी म.न.पा. मार्फत होणारा सकाळ नंतरच्या पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
दि. १५/१०/२०२० रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतचा पाणीपुरवठा करणेत येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत WD4 (भाग मोशी, डुडुळगाव ,च-होली, वडमुखवाडी इ.) इंद्रायणीनगर, भोसरी, संततुकाराम नगर दिघी मॅगझीन या टाक्यांवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील.
दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे वर नमुद टाक्यांवरून होणा-या भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. १६/१०/२०२० रोजी होणारा पाणीपुरवठा अनियमित कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी म.न.पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून म.न.पा.स सहकार्य करावे, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरवासियांना केले आहे.