- आज २४६ जणांना कोरोनाची बाधा तर, १६ जणांचा मृत्यु; ६०९ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) रोजी २४६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले ०६ पुरुष रुग्ण हे भोसरी (७४ वर्षे), मोशी (६५ वर्षे), चिंचवड (५९ वर्षे), दिघी (५७ वर्षे), वाकड (७७ वर्षे), पिंपळे गुरव (६३ वर्षे), ०३ स्त्रीया – अजमेरा (६८ वर्षे), चिंचवड (६६ वर्षे), घरकुल (२१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले ०७ पुरुष रुग्ण हे तळेगांव (४८ वर्षे), पिंपळगांव (६३ वर्षे), शिरुर (५८ वर्षे), चाकण (६१ वर्षे), बदलापूर (५४ वर्षे), देहूगांव (६५ वर्षे), खेड (५० वर्षे) रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८४०३१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७८७५८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १४४१ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















