- राष्ट्रवादीच्या गडाला भाजपचा विळखा; आ. जगतापांच्या हस्ते उद्घाटन झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २२, काळेवाडी येथील ज्योतिबानगर मधील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्यावरील सुरु करण्यात येणा-या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज पार पडले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य विनोद नढे, संतोष कोकणे, नगरसदस्या निता पाडाळे, उषा काळे, माजी नगरसदस्य प्रमोद ताम्हणकर, उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर, राजेंद्र जावळे,
कनिष्ठ अभियंता संजय कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते विलास पाडाळे, कैलास सानप, विनोद तापकीर, काळूराम नढे, अतुल नढे, विशाल नढे, पद्माकर जांभळे, अरूण बकाल, प्रकाश चिटणीस, संगिता कोकणे आदी उपस्थित होते.
ज्योतिबानगर मधील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्यावरील काँक्रीटीकरणाच्या कामासाठी सुमारे ६ कोटी ५० लाख इतका खर्च येणार आहे.
दरम्यान प्रभाग क्र. २२ मधील चौघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. सध्या महापलिकेत भाजपची सत्ता आहे. तर लक्ष्मण जगताप हे चिंचवडचे सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत. या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पार पडल्याने राष्ट्रवादीचे हे चारही नगरसेवक आमदार जगतापांच्या गळाला लागले तर नाहीत ना, असा सवाल प्रभागातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.


















