न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- शेतकरी संघर्ष संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदावर पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश ढगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विष्णु दादा कुर्हाडे, राज दादा तपसे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
या कार्यकाळात संघटनेची ध्येयधोरणे, शिस्त, आचार संहिता संघटनेतील ज्येष्ठ पदाधिकारी सन्मान व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात उत्तम समन्वय ठेवून संघटनेला अभिप्रेत असे, सकारात्मक व परिणामकारक कार्य करुन संघटनेचा विचार जो शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा आहे. त्यांचा प्रचार करतांना व्यापक व कणखर संघटन बांधून शेतकरी हितार्थ चळवळ निर्माण कराल, असे पत्रात म्हटले आहे. त्यांच्या निवडीबद्दल शेतकरी वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


















