न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- ग्राहकांच्या वाढीव वीजबिलाचा प्रश्न, वीजबिल दुरुस्ती असे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरणच्या वतीने मोहननगर येथे ‘तक्रार निवारण आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. याला वीजग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गेली अनेक दिवसांपासून नागरिकांना वीजबिलासंदर्भात अडचणी आहेत. नागरिकांना वेळ व पैसा खर्च करून पायपीट करत थरमॅक्स चौकातील महावितरणच्या कार्यालयात जावे लागत आहे. याठिकाणी रांगेत बराच वेळ थांबावे लागत आहे. या याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. त्रास होऊ नये, वीजबिल संदर्भात तक्रार निवारण व्हावी, या उद्देशाने मोहननगर येथील शिवपार्वती सभा मंडपात तक्रार निवारण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात नागरिकांच्या वीजबिल दुरुस्ती, नादुरुस्त, मीटर बदलणे, बिलाचे हाप्ते करणे, बिला संदर्भात गैरसमज दूर करणे इत्यादी कामे मार्गी लावण्यात आले. या पसिरातील अनेक वीजग्राहकांचे प्रश्न या उपक्रमात मार्गी लावले. सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे यांच्या प्रयत्नाने व महावितरण कंपनीचे अतिरिक्त अधीक्षक अभियंता उमेश कवड, कनिष्ठ अभियंता कृत्तिका भोसले, सहायक लेखापाल परब यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.


















